नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने १५ ठिकाणावर छापेमारी केली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही छापेमारी केली आहे. शोपिया , अनंतनाग, बडगाम, बारामुल्ला, श्रीनगर ,पुंछ, राजौरी या जिल्ह्यामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान पुंछ व बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर भीषण हल्ला केला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोपियानमध्ये तीन ठिकाणी, अनंतनागमध्ये चार ठिकाणी, बडगाममध्ये दोन ठिकाणी, बारामुल्लामध्ये एक ठिकाणी, राजौरीमध्ये एक ठिकाणी आणि पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी छापे टाकले आहेत.यापूर्वी २ मे रोजी एनआयएने दहशतवादी कट प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये १२ ठिकाणी छापे टाकले होते. काश्मीरमधील ११ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले, ज्यात पुलवामामधील ८ ठिकाणे, कुलगाम, बडगाम आणि अनंतनागमधील १ ठिकाण आणि जम्मूच्या पूंछ भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले होते.