द केरला स्टोरी : मर्यादेपलीकडे द्वेष सहन करायला तयार व्हा
विवेक अग्निहोत्रीचा द केरला स्टोरीच्या टीमला सल्ला
07-May-2023
Total Views |
नवी दिल्ली : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. आता देखील पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ' द केरला स्टोरी' चित्रपटाबद्दल अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते म्हणाले की, हा चित्रपट त्याच्या विषयामुळे रिलीज झाल्यापासून वादात सापडला असला तरी लोकांचा मोठा पाठिंबा चित्रपटाला मिळत आहे. तसेच हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे.
विवेक अग्निहोत्रीने टविट् मध्ये लिहले आहे की, विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि द केरला स्टोरीची निर्माती अभिनेत्री अदा शर्मा यांना इशारा दिला आहे की, या चित्रपटानंतर तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. ते म्हणाले , प्रिय विपुल शाह आणि सुदिप्तो सेन आणि अदा शर्मा तसेच द केरला स्टोरीची संपूर्ण टीम, या धाडसी प्रयत्नासाठी मी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन करतो. याशिवाय मी तुम्हाला एक वाईट बातमी देतो की आता तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. मर्यादेपलीकडे द्वेष सहन करावा लागेल. तुमचा गुदमरायला सुरुवात होईल, असे ही विवेक अग्निहोत्री म्हणाले.
यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, आता मला कळले आहे की सिनेमात खूप ताकद असते जी कदाचित मीडिया आणि राजकारणातही नसते. सिनेमाची ताकद इतकी असू शकते की, सिनेमा खरा इतिहास मांडू शकतो. तसेच राष्ट्राच्या व्यापक हितासाठी सॉफ्ट पॉवर बनू शकते. भारतात या प्रकारचा सिनेमा बनवणे खूप अवघड आहे. तरी आपण ते काम केले म्हणून आपले अभिनंदन, असे अग्निहोत्री म्हणाले.