सैफ सलमानी परिवार वर कडक कारवाई होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    30-May-2023
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : १३ वर्षाच्या भांडुपच्या हिंदू मुलीचे अपहरण करणाऱ्या सैफ सलमानी परिवार वर कडक कारवाई होणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुपच्या पीडित परिवाराला दिले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पिडीतेच्या कुटुंबियांसह ३० मे रोजी मंत्रालयात भेट झाली.
 
भांडुप खिंडीपाडा येथील हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय सैफ खानने १३ वर्षाच्या एका हिंदू मुलीला आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिला त्याच्या मूळ गावी आझमगडला घेऊन गेला. तसचं तिचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला होता. सैफ खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर त्या मुलीला मुंबईमध्ये आणण्यात आलं आहे.