केरला स्टोरी प्रपोगंडा फिल्म - अनुराग कश्यप

    29-May-2023
Total Views | 87

kerla story 
 
मुंबई : द केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादानंतर विविध चित्रपट सृतीतून अनेकानेक प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. हा चित्रपट वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला असून, अभिनेता कमल हसन आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांनी त्यावर आपली मते मांडली आहेत. सुदिप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट केरळमधील एका हिंदू महिलेच्या कथेवर चित्रपट आधारित आहे. जिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये भरती करण्यासाठी तिची तस्करी करण्यात आली. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे.
 
अनुराग कश्यपने या चित्रपटावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे परंतु, चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हा एक प्रचारकी चित्रपट म्हणून पाहिला जाऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. आजच्या चित्रपटसृष्टीत राजकारण खूप खोलवर रुजले आहे आणि चित्रपटांना राजकारणापासून दूर असणे अवघड आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांनी नमूद केले की "द केरळ स्टोरी" सारख्या चित्रपटांना प्रचार मानले जाऊ शकते परंतु सर्जनशील अभिव्यक्तीच्या कोणत्याही स्वरूपावर बंदी घालण्याविरुद्ध त्यांची भूमिका व्यक्त केली.
 
यापूर्वी कमल हसन यांनीही यावर असेच मत व्यक्त केले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, हसनने या चित्रपटाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि हा प्रचार चित्रपट असल्याचे विधान केले. केवळ सत्य कथेवर आधारित चित्रपट असल्याचा दावा करणे पुरेसे नाही, असे त्यांनी सांगितले होते. कथेची सत्यता महत्त्वाची आहे असे म्हणत, द केरळ स्टोरी अयशस्वी ठरल्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121