महापालिका भूसंपादन घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांनी दाखल केली तक्रार
29-May-2023
Total Views |
मुंबई : मुंबई महापालिकेच्या भूसंपादनासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दहिसरचा १ हजार ७२२ कोटींचा भूसंपादन घोटाळाच्या विरोधात किरीट सोमय्यांनी एसीबी कार्यालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत विकासक अल्पेश अजमेरावर आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, विकासक अल्पेश अजमेरा यांनी 2 कोटीत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन घेतली, असा गंभीर आरोप भाजप किरीट सोमय्यांनी केला आहे.
हा सर्व घोटाळा मातोश्रीवर पैसे पोहचवण्यासाठी केला असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला. तसेच, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पुर्ण कल्पना होती असेही सोमय्यांनी म्हटले. या प्रकरणी लोकायुक्त, कॅगला तक्रारी दिल्या. मुंबई पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आपले म्हणणे नोंदवून घेण्यात आले आहे, मंत्रालयतील अधिकाऱ्यांची परवानगी घेणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, किरीट सोमय्या एसीबीच्या कार्यालयात पोहचले आहे. तिथे मुंबई पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक खाते वरळी कार्यालयात दहिसरचा हजारो कोटींच्या मुंबई महापालिका भूसंपादन घोटाळाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, बिल्डर अल्पेश अजमेरा यांनी २.५५ कोटीत जमीन खरेदी केली. तर महापालिकेने ३४९ कोटी रुपये पेमेंट केले. या सर्व आरोपांवर बिल्डरने न्यायालयात अपील दाखल केले. १ हजार ७२२ कोटी भरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान, दि.२९ मे ला दहिसर भूखंड घोटाळ्याची अधिकृत चौकशी सुरु झाली आहे. तसेच, बोरिवलीत तक्रार दाखल करत विकासक अल्पेश अजमेरा यांनी 2 कोटीत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांना न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर बिल्डरने १७०० कोटी रुपये व्याजासह देण्याची मागणी न्यायालयात केली आहे.