पाकिस्तानात परराष्ट्र मंत्र्यांनाच पाणी मिळेना!

    27-May-2023
Total Views |
Bilawal Bhutto Zardari

नवी दिल्ली
: पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे पाणी मिळत नसल्याने पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहेत. मी परराष्ट्र मंत्री असून मला पाणी विकत घ्यावे लागते, माझ्या घरी टँकर बोलवावा लागतो, असे भुट्टो या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. कराचीतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे.त्यामुळे पाकिस्तानने SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारतात घेतली होती. यादरम्यान एस. जयशंकर यांनी बिलावलसमोर पाकिस्तानला चांगलेच सुनावले होते. त्याचवेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो ते म्हणाले की या महिन्याच्या सुरुवातीला SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्याचा भारताचा निर्णय देशासाठी फलदायी आणि सकारात्मक ठरला.