औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केले नाही; मशिद समितीचा न्यायालयात दावा
24-May-2023
Total Views |
नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेब हा क्रूर नव्हता आणि त्याने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केल नव्हते, असा दावा अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयात केला आहे. ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या हिंदूंच्या मागणीविरोधात मुस्लिम पक्षाने आपले उत्तर दाखल केले आहे. मुस्लिम पक्षाने २६ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून पुरातत्त्व सर्वेक्षणास विरोध केला आहे.
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वाराणसीमध्ये दोन काशी विश्वनाथ मंदिरे (जुने आणि नवीन) ही संकल्पना नव्हती. त्याचप्रमाणे मुघल शासक औरंगजेब हा क्रूर नव्हता आणि त्याने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केलेले नाही. हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने वरील विधान करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे मस्जिद आलमगिरी/ज्ञानवापी मस्जिद या ठिकाणी हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली रचना किंवा इमारत ही कालही मशीद होती आणि आजही आहे. वाराणसी आणि शेजारील जिल्ह्यांतील मुस्लिम कोणत्याही बंधनाशिवाय आणि हक्काच्या बाबी म्हणून नमाज पंजगाना, नमाज जुमा आणि नमाज इधान देत आहेत. त्याचप्रमाणे संबंधित वादग्रस्त जागा ही मशिद असल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट दिसत असल्याने एएसआयला जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, असाह दावा करण्यात आला आहे.