नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण : ओवैसी म्हणतात, "राष्ट्रपतींच्या हस्ते नको...!"
24-May-2023
Total Views |
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्धाटन दि.२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते होणार आहे. परंतू उद्धाटनाआधीच विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. तसेच मोदींच्या उद्घाटनाला विरोध करणाऱ्या बहुतांश विरोधी पक्षांनी समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्धाटन करू नये, असे विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी केले आहे.
ओवैसी म्हणाले की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधान मोदींनी करू नये. नवीन संसद भवनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते व्हायला हवे. कारण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे आहेत. त्यामुळे जर मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले तर त्यांच्याकडून घटनात्मक नियमांचे उल्लघंन होईल.त्यामुळेच केंद्र सरकारवर घटनात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ओवैसींनी केला. तसेच स्पष्टपणे सांगितले की, जर नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार असतील तर ते समारंभात सहभागी होणार नाहीत.
दरम्यान भारतीय संसदेची नवी वास्तू विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिक ठरणार आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्विटद्वारे केले आहे. देशाच्या नव्या संसदेची उभारणी पूर्ण झाली असून येत्या २८ मे रोजी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी ट्विटद्वारे संसदेच्या नव्या वास्तूविषयी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, संसदेची नवनिर्मित इमारत भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करेल. या इमारतीमध्ये सन्माननीय सदस्य देश आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. देशाते पंतप्रधान २८ मे रोजी ही इमारत राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचप्रमाणे १४० कोटींहून अधिक देशवासीयांच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करून, संसदेची नवनिर्मित इमारत २०४७ सालापर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प साध्य करण्यासाठी एक सशक्त माध्यम बनेल, असाही विश्वास बिर्ला यांनी यावेळी व्यक्त केला आहे.