जयपूर : राजस्थानात विधानसभा निवडणुकीचे पडघत वाजत असतानाच, काँग्रेसचे दोन दिग्गज नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन्ही नेते पुन्हा एकदा उघडपणे समोरासमोर आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले असून ११ एप्रिल रोजी ते एक दिवसीय उपोषण करणार आहेत.
सरकारने भ्रष्टाचारावर कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. असून आपल्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात पायलट यांनी गेहलोत यांना कोंडीत पकडण्याचा डाव टाकला आहे.पायलट म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्रही लिहिले आहे. निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. निवडणुका समोर आहेत. आम्ही जे बोललो ते आम्ही करतो, हे जनतेने पाहावे. मात्र मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्या पत्राला प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.पायलट म्हणाले की, राजस्थानमध्ये आम्ही तपास यंत्रणांचा वापर करत नाही किंवा त्यांचा गैरवापरही करत नाही. पण आमच्या बोलण्यात आणि वागण्यात काही फरक आहे असे आमचे कार्यकर्ते आणि जनतेला वाटू नये. यासाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.