बैठकीपुर्वीच सदस्यांचा गदारोळ, विषय पत्रिकेबाबत एकमत नाही

भाषा सल्लागार समितीची १२ एप्रिलला बैठक

    07-Apr-2023
Total Views |

marathi bhasha samiti
 
 
मुंबई : भाषा सल्लागार समितीची बैठक तब्बल एक वर्षाच्या काळानंतर १२ एप्रिल ला होत आहे. या बैठकीची विषयपत्रिका नुक्तीच जाहीर झाली. मात्र विषयपत्रिकेतील विषयांवर अनेक सदस्य नाराज असल्याचे समजते. भाषा धोरण, अभिजात दर्जा अशा अनेक विषयांवर चर्चा होणारच नसल्याचे विषय पत्रिकेतून समोर आले आहे.
 
ग्रंथालय चळवळ बळकट करणे आणि ग्रंथपालांचे प्रश्न सोडवणे हे मुख्य विषय त्यात आहे. यावरही सदस्यांचा आक्षेप आहे. भाषेविषयी चर्चा होत असताना अभिजात दर्जा या विषयाला स्थान न देता ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यात कशा येतात असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला आहे. विषय सूचिबडाळून हवी म्हणूनही छुपी मागणी करण्यात आली आहे.
 
दरम्यान विषय सूचित असलेल्या विषयांची याद उपलब्ध झाली आहे. यात प्रामुख्याने वाचनसंस्कृतीचा विकास आणि वाचनाची गोडी कशी लावावयावर चर्चा होणार आहेत. भाषा मंत्र्यांचे भाषण व त्यावर चर्चा असा मोठा कार्यक्रम असल्याने इतर विषयावर दुर्लक्ष होऊ नये असे पाहावे, अशी मागणी सदस्यांनी केली.