उध्दव ठाकरेंच्या सभेच्या जागी हनुमान चालिसा म्हणा, त्या जागेचं शुद्धीकरण करा!

- नवनीत राणांचा हल्लाबोल!

    06-Apr-2023
Total Views | 53
 
Navneet Rana
 
 
अमरावती : हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी २१ वेळा हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. "उध्दव ठाकरे अत्याचारी मुख्यमंत्री होते. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गाडले. उद्धव ठाकरे जिथे-जिथे सभा घेतात. तिथे हनुमान चालिसा म्हणा. त्या जागेचं शुद्धीकरण करा. कारण उद्धव ठाकरे देवाला मानत नाहीत. ते जातात आणि सभा घेतात. त्यामुळे ती जागा अशुद्ध होते. त्या जागेचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे." असं नवनीत राणा म्हणाल्या.
 
अटक झालेला प्रसंग सांगताना नवनीत राणा भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "लढणं काय असतं ते वाळासाहेबांनी शिकवलं. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली झालेली अटक सहन करण्यासारखी नव्हती. माझ्या अटकेवेळी पोलिसही भावुक झाले होते. मी आता रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी तयार आहे. जेलमध्ये टाकुनही ते मला तोडु शकले नाही. जेलमध्ये प्रत्येक दिवशी १०१ वेळा हनुमान चालिसा पठण केले."
 
"आमची गरिबांसाठी असणारी आस्था ही उध्दव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. ठाकरे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. त्यांचा असणारा हा घमंड लवकरच उतरेल. उध्दव ठाकरे ५६ वर्षांपासुन ज्या कुटुंबात तुम्ही मोठे झाले, ते घर तुम्ही सांभाळु शकला नाहीत. त्याच विचारधारांवर तुमचे ४० आमदार निवडुन आले. याच विचारधारांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी जीवाच राणं केलं, पण उध्दव ठाकरेंनी तीच विचारधारा गाडुन टाकली. यासाठी बाळासाहेब ठाकरेंही उध्दव ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत." असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121