वॉशिंग्टन : ‘बॅरॉन’च्या अमेरिकन फायनान्समधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पाच महिला अधिकार्यांची नावे झळकली आहेत. ‘बॅरॉन’च्या चौथ्या वार्षिक यादीमध्ये ‘जेपी मॉर्गन’च्या अनु अय्यंगार, ‘एरियल इन्व्हेस्टमेंट्स’च्या रुपल जे भन्साळी, ‘गोल्डमन सॅक्स ग्रुप’च्या मीना लकडावाला-फ्लिन, ‘फ्रँकलिन टेंपलटन’च्या सोनल देसाई आणि ‘बोफा सिक्युरिटीज’च्या सविता सुब्रमण्यन यांचा समावेश होता.