भाजपा व सन्मान फाऊंडेशनच्यावतीने आमदार सन्मान चषक कबड्डी स्पर्धा

    03-Apr-2023
Total Views |
kabaddi tournament

ठाणे :
 ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ठाण्यात भारतीय जनता पक्ष व सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता ठाण्यातील गोदुताई परुळेकर मैदान येथे सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतंर्गत आमदार सन्मान चषक - २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात या स्पर्धेसाठी सहभागी संघाची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यावेळी आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे,माजी नगरसेवक नारायण पवार,सुनेष जोशी, संजय वाघुले, आयोजक रमेश सागळे, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ सल्लागार शिवाजी दळवी यांच्या हस्ते सुधागड तालुक्यातील सर्व कबड्डी संघांच्या समोर काढण्यात आले.

ठाण्यातील सिद्धेश्वर तलावजवळील गोदुताई परुळेकर मैदानात ‘आमदार सन्मान चषक २०२३’ कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत संघनिहाय लॉटरी काढण्यासाठी सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सुधागड तालुका रहिवासी सेवा ठाणे संस्थेचे सल्लागार रमेश सागळे, संयोजक राकेश थोरवे, प्रकाश शिलकर,जय गणेश दळवी, अविकांत साळुंके, सुधीर नेमाणे, अजित सागळे यांच्यासह धनंजय खाडे, विजय जाधव, भगवान तेलंगे, अनिल चव्हाण हे उपस्थित राहून सहकार्य केले. विशेष म्हणजे फक्त सुधागड तालुक्यातील संघ यावेळी खेळवले जाणार आहेत. अशी माहिती रमेश सागळे यांनी दिली.