जळगाव : निवडून दिलेले गद्दार, पण निवडून देणारे माझ्यासोबत आहेत. असं म्हणत उध्दव ठाकरेंनी शिंदेंसह आमदारांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा सुरु आहे. पाचोऱ्याच्या सभेतील गर्दी पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, "पाकिस्तानला पण माहितीय शिवसेना कोणाची आहे. कोणालाही कळेल शिवसेना कोणाची परंतु मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल."
"काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत."
पाचोऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका शेतकऱ्याच्या कवीतेच्या काही ओळी बोलून दाखवल्या.
झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती
तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंधी पण आमच्या कापसाला भाव कधी?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "या शेतकऱ्याला मी मंचावर आणलं नाही कारण, हे सरकार त्याच्यावर कारवाई करू शकतं."