मुंबई : जळगावात उध्दव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. परंतु, यापुर्वीच जळगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. मंत्री गुलाबराव पाटलांसह जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची आज भव्य जाहीर सभा होणार आहे. पाचोरा येथील सावा मैदानात सायंकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार असून या सभेत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे, शुभांगी पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या निशाण्यावर गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील किशोर पाटील हेच सर्वाधिम निशाण्यावर राहतील. कारण स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पुन्हा शिवसेना उभी राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेतून फुटलेले आमदार निशाण्यावर असतील. उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आर ओ त्यात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत आहेत तर त्यावर बोलावं , आमच्या विरोधात बोललेले तर सभेत घुसू असा इशाराच दिल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. राऊत यांनीही सभेत घुसून दाखवा परत कसे जातील हे पाहू असा प्रति इशारा दिल्याने आणखीनच वातावरण गरम झालं आहे.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानीही गुलाबराव पाटील सभेत घुसले तर 51 हजारांच बक्षीस देउ अस आव्हान दिले आहे.तर शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सभेत गुलाबराव पाटलांचे मुखवटे घालून आपण घुसणार असल्याचा दावा केलाय.यामुळे शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत सभेस्थळी काहीही घडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.