ठाकरेंच्या जळगाव सभेआधीच राउतांना ताकीद!

    20-Apr-2023
Total Views |
 
sanjay raut
 
 
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. याच पार्श्वभुमीवर या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचं स्वागतच आहे. परंतु, संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार. असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
 
माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचं आयोजन केले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे.” असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
 
दरम्यान, गुलाबराव पाटलांच्या या इशाऱ्याला राऊतांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांना आत पत्रकार परिषद प्रश्न विचारण्यात आला. राऊत म्हणाले, “घुसा घुसा. तुम्ही आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा.” असं प्रतिआव्हान दिलं आहे.