नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौर हिला बुधवारी अमृतसर विमानतळावर थांबवण्यात आले. किरणदीप कौर विमानतळावरून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच तिची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरणदीप कौर ही अमृतसर विमानतळावरून दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या विमाने लंडन येथे रवाना होणार होती. याची माहिती पंजाब पोलिसांना मिळताच त्यांनी विमानतळावरच तिला ताब्यात घेऊन चौकशीस प्रारंभ केला आहे.
दरम्यान अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पंजाब पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या अटकेसाठी कारवाई सुरू आहे. फरार अमृतपालच्या अनेक साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे, मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. सध्या अमृतपाल सिंग अमृतसर आणि तरन तारणच्या परिसरात लपून बसला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.