पुतीन पुन्हा व्हेंटिलेटरवर!

    19-Apr-2023
Total Views |
russia president putin on ventilator

रशिया
: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पुन्हा व्हेंटिलेटरवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची प्रकृती बिघडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका कार्यक्रमाला पुतीन यांनी उपस्थिती लावली होती. त्यादरम्यान, त्यांच्या मानेवर जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन सबंध जगात पुतीन यांच्या तब्येतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्यांना फुप्फुसाचा आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांना श्वासोच्छवासाला मदत करणाऱ्या साधनांद्वारे आॅक्सिजन दिले जात असल्याची माहिती आहे.त्यासंबंधी काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पुतीन हे रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.