डोंबिवलीत उद्योजक मेळाव्याचे आयोजन

डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व‌ पुण्याच्या प्रसिद्ध "दे आसरा" यांचा संयुक्त उपक्रम

    12-Apr-2023
Total Views |
dombivli-Brahmin-entrepreneur-De Asara-Pune

डोंबिवली
: डोंबिवली ब्राह्मण उद्योजक व पुणे येथील व्यावसायिकांसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संस्था 'दे आसरा' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली मध्ये प्रथमच उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा दिनांक 21 एप्रिल 2023, माधवाश्रम हॉल, रोटरी शाळेजवळ, मानपाडा रोड, डोंबिवली पुर्व येथे घेण्यात येणार आहे.

या उद्योजक मेळाव्यामध्ये भारत सरकार तर्फे लघु व मध्यम उद्योजक यांच्यासाठी ज्याकाही कर्जाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत त्या सगळ्यांचे मार्गदर्शन दे आसरातर्फे करण्यात येणार आहे.तसेच त्या कर्जच्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या साठी सुद्धा दे आसराकडून मदत केली जाते.

त्याचप्रमाणे आपला व्यवसाय हा 15 सेकंदात नविन व्यक्तीला कश्याप्रकारे सांगायचा व त्यासाठीच मार्केटिंग स्किल कसे असायला पाहिजे यावर उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. समाजातील सर्व उद्योजक, लघु, मध्यम व मोठे उद्योजक ह्या उद्योजक मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे केदार पाध्ये यांनी सांगितले.