मुंबई : कर्नाटकच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र भाजपचे नेते स्टार प्रचारक म्हणून कर्नाटकला प्रचारासाठी जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.
यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. याच अनुषंगाने भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना काल दिल्लीत बोलावण्यात आले होते. योगेश सागर आज कर्नाटकासाठी रवाना होणार असून प्रसाद लाड १४ एप्रिलला कर्नाटकला जाणार आहेत. या मुंबईच्या तीन नेत्यांसह आमदार राम शिंदे, जयकुमार रावल यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.