Kirit Sommaiya - FIle Photo
पुणे (वेब डेस्क) : "शंभर कोविड रुग्णांचे शारिरीक नुकसान संजय राऊतांचे व्यावसायिक भागीदार सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीमुळे झाले. बऱ्याच रुग्णांच्या हृदय, यकृतांच्या समस्या या रुग्णालयात दाखल झालेल्यांना आता जाणवत आहेत. जी कंपनी अस्तित्वातच नव्हती. केवळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पीएमआरडीने अस्तित्वात नसलेल्या कंपनीला कंत्राट दिले. त्याच्यामुळे तीन रुग्णालयाचा मृत्यू झाला.", असा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. महापालिकेने कोविड काळात कंत्राट दिलेल्या लाईफलाईन कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर होते.
"तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांच्या आदेशाने अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर कंपनी काळ्यायादीत सामील करण्यात आली. मात्र, अपेक्षेप्रमाणे कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्वरित मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप पुणे शहरप्रमुख जगदीश मुळीक यांच्यामार्फत करणार आहोत. या मागणीचे त्वरित रुपांतर हे एफआयआर दाखल करावा, अशी आग्रही भूमिका आमची असेल," असे किरीट सोमय्या (Kirit Sommaiya) म्हणाले.
"संजय राऊतांच्या सहकारी सुजीत पाटकर यांच्यामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई कशी करणार, गुन्हा दाखल होणार का?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. याच काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा उद्धव ठाकरेंचे सुपूत्र, तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात कोविड जम्बो सेंटरसाठी अतिदक्षता विभागाचा परवाना दिला कसा, याची चौकशी व्हावी. मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि या संदर्भातील जबाबदारांवर कठोर कारवाई करा," अशी मागणी सोमय्या यांनी केला आहे.
"कोविड रुग्णालयातील हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केलं. यामुळेच मी शिवाजी नगर पोलीस ठाणे, पुणे महापालिकेत तक्रारीसाठी गेलो असता मला उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी मारहाणीचा प्रयत्न केला. या अंतर्गत एकूण ७० मारहाणकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा मी पोलीसांकडे केली आहे.", असेही सोमय्या म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन माझ्याविरोधातच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. यासगळ्या प्रकारणावर सात दिवसांची मुदत दिली आहे. जर का पुणे महापालिका आणि पोलीसांनी जर का कारवाई केली नाही, तर पुन्हा पुण्यात येऊन पाठपुरावा करणार," असे निर्देश किरीट सोमय्यांनी (Kirit Sommaiya) दिली आहे.