अमृतसर : ’वारिस पंजाब दे’ चा प्रमुख अमृतपाल सिंगच्या अतिशय जवळचा सहकारी पपलप्रीत सिंगला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिस आणि सीआयएची ही संयुक्त कारवाई आहे. पपलप्रीत सिंगला होशियारपूरमधून अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग आणि पपलप्रीत हे दोघेही होशियारपूरमधून विभक्त झाले होते. ते फरार होण्याच्या दिवशी सोबतच होते.