मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'मागेल त्याला शेततळे’ योजनेबद्दल महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा आता व्यापक विस्तार केला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार केला जाईल. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण केले जाणार आहे. मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर आदी सुविधा दिल्या जाणार आहे. या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च करणार, असल्याची माहितीही त्यांनी दिली.