विद्यार्थ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका वेळीच ओळखावा : योगिता साळवी

    25-Mar-2023
Total Views |
Love Jihad


मुंबई
: “आपले आयुष्य घडवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका वेळीच ओळखावा,” असा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिला. बालगोविंद विद्यामंदिर, मोगरापाडा, अंधेरी येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेंतर्गत शुक्रवारी आयोजित व्याख्यानात त्या विद्यार्थ्यांना ‘किशोरवयीन मुले-मुली आणि ‘लव्ह जिहाद’चा धोका’ या विषयावर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी बोलताना योगिता साळवी म्हणाल्या की, “सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून किशोरवयीन मुलामुलींशी संपर्क साधत त्यांना बळी बनवले जाते.” तसेच या वयातील स्वप्न आणि वास्तव, ‘लव्ह जिहाद’, त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत मांडले. बालगोविंद शाळेचे सहकार्यवाह शेखर पारखी, शाळेचे मुख्याध्यापक हरी शंकर बुरंगे तसेच सर्व शिक्षकगण उपस्थित होते. सविता साबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.