जितेंद्र आव्हाड ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड!

आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात

    20-Mar-2023
Total Views |

Jitendra Avhad
( Jitendra Awhad - File Photo)
मुंबई : "सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे," असे वक्तव्य केलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad ) भाजप नेते आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा जातवादी पक्ष हीच महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे, असा घणाघात त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर लगावला आहे. आव्हाडांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दलच्या विधानाचा विरोध करताना संपूर्ण सनातन धर्माविरोधात गरळ ओकली होती.
 
 
 
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. आमचे दुर्दैव आहे. सनातन धर्माचा प्रसार करणाऱ्यांना मुंबईत बोलावले जात आहे हे आमचे दुर्दैव. धर्म म्हणजे काय? सनातन धर्माची व्याख्या आपण समजून घेत नाही. सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडले जाते. मात्र, हा धर्म पूर्णपणे वेगळा आहे, असा दावाही त्यांनी केला.
 
 
या प्रकरणी भाजपचे युवा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाण्यातील युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी आव्हाडांच्या घराबाहेर निषेध आंदोलन करून आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपचे युवा कार्यकर्ते आव्हाडांचा घराबाहेर आंदोलन करणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लागली होती, त्यामुळें राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळें काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.


अग्रलेख