मुंबई : उपनगरीय लोकल आणि मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याकरिता रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या गणवेशावर बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय आरपीएफ पोलिसांकडून घेण्यात आला आहे. येत्या महिन्याभरत हे ४० कॅमेरा मुंबई विभागात दाखल होणार असून या कॅमेऱ्यांची मदत रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी होणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सुमारे ४० कॅमेरे मध्य रेल्वे पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून हे कॅमेरे पोलिसांच्या गणवेशाच्या एका बाजूला बसविण्यात येणार आहेत. तसेच टप्या टप्याने या कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून या कॅमेऱ्यांमुळे गाड्यांमधील चोऱ्यांसह गाड्यांमध्ये शिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवरही लक्ष ठेवण्यास मदत पोलिसांना आता मदत मिळणार आहे.