‘लव्ह जिहाद’ला हद्दपार करा

पंचगंगा रहिवासी संघात योगिता साळवी यांचा घणाघात

    13-Mar-2023
Total Views |
Love Jihad

मुंबई : ‘लव्ह जिहाद’ हे फार मोठे षड्यंत्र असून त्याचे जीवघेणे परिणाम आपण पाहत आहोत. अशा या कारस्थानाला हद्दपार केलेच पाहिजे,” असा घणाघात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांनी केला आहे. पंचगंगा रहिवासी संघ महिला मंडळ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून करी रोड येथील संकुलच्या प्रांगणात ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे आयोजन शनिवार, दि. ११ मार्च रोजी आयोजन करण्यात आले. त्यावेळी योगिता साळवी बोलत होत्या.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना साळवी यांनी देशभरात घडलेल्या ’लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम याचे वास्तव मांडले. तसेच ‘लव्ह जिहाद’ आणि त्याचे स्वरूप व परिणाम याबाबतही त्यांनी महिलांशी संवाद साधला.महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणारा कायदा कसा आवश्यक आहे, हेही त्यांनी यावेळी सांगून महाराष्ट्रात तत्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा मंजूर झालाच पाहिजे, असेही सांगितले.या कार्यक्रमामध्ये कृष्णा सागर यांनी ’लॅण्ड जिहाद’ या विषयी स्वानुभव कथन केले. यावेळी राजेश पाटील, सचिन दरेकर, महेश भिंगार्डे यांच्यासह परिसरातील महिला, नागरिकांसह सामाजिक संघटना व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.