केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची राहुल गांधींवर टीका
10-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली : “भारतातील लोकांना माहीत आहे की राहुल गांधी पप्पू आहेत. परंतु, परदेशी लोकांना ते पप्पू आहेत हे माहीत नाही,” असा टोला लगावात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी सध्या इंग्लंडच्या दौर्यावर असून तेथे त्यांनी भारतविरोधी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. केम्ब्रिज विद्यापीठातील राहुल गांधींच्या भाषणावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले की, ‘’राहुल गांधी भारताच्या एकात्मतेसाठी अत्यंत धोकादायक झाले आहेत. राहुल गांधी आता लोकांना भारताचे विभाजन करण्यासाठी भडकवत आहेत,” असे रिजिजू म्हणाले.
ट्विटमध्ये किरेन रिजिजू म्हणाले, “स्वयंघोषित काँग्रेस राजकुमाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा माणूस भारताच्या एकात्मतेसाठी खूप धोकादायक झाला आहे. आता तो लोकांना भारताचे विभाजन करण्यासाठी भडकवत आहे. भारताचे सर्वात लोकप्रिय आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकच मंत्र आहे, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ” असेही रिजिजू यांनी म्हटले आहे.