रोम : इटलीच्या दक्षिण तटवर्ती भागात खवळलेल्या सागरात स्थलांतरितांची लाकडी नौका फुटून झालेल्या दुर्घटनेत ५९ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यात १२ मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती इटलीच्या अंतर्गत मंत्री वॉन्डा फेरो यांनी दिली आहे.