नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. लवप्रीत तुफानच्या सुटकेचे आश्वासन मिळेपर्यंत पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला. त्यानंतर अजनाला न्यायालयाने तुफानच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
'वारीस पंजाब दे' नावाच्या संघटनेचा नेता अमृतपाल सिंग याने पोलीस ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा समर्थक तुफान सिंगच्या सुटकेसाठी अल्टिमेटम दिला होता. यापूर्वी अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखीच हत्या होईल, अशी धमकी दिली होती. त्याचप्रमाणे लवप्रीतच्या सुटकेसाठी खलिस्तान समर्थकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला सशस्त्र हल्ला करून ते ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला होता.