राज्य सरकारची छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

समाधी स्थळ विकासासाठी 398 कोटींचा आराखडा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    15-Feb-2023
Total Views |
 
Chhatrapati Sambhaji Maharaj
 
 
मुंबई : “महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी प्राणार्पण करणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांना राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारकडून मानवंदना देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित असलेल्या वढु बुद्रुक आणि तुळापूर या दोन ठिकाणांसाठी राज्य सरकारच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे अंतिम सादरीकरण मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत करण्यात आले असून या कामासाठी प्रस्तावित असलेला 397 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारच्यावतीने मागील काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याशी संबंधित विषयांना हाताळले जात असून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकासासाठीचा आरखडा म्हणजे सरकारने छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली मानवंदनाच आहे,” अशी भावना आता व्यक्त केली जात आहे.
 
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीविषयी बनवण्यात आलेला हा आराखडा पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण केले. या प्रकल्पाचे भूमिपूजन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि. 14 मे रोजी करण्याचानिर्णय घेण्यात आला असून त्यानुसारच कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
भव्य भगव्या झेड्यांसाठी 13 कोटींची स्वतंत्र मंजुरी
 
वढु बुद्रुक व तुळापूर येथे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 6.50 कोटींचा (जीएसटीसह) भव्य भगवा झेंडा कायमचा उभा करण्याच्या कामाचा वरील प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात आला असून या नवीन कामामुळे आता हा संपूर्ण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा आता 397 कोटींचा झाल्याची माहिती शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी यावेळी दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याचे फडणवीस-शिंदेंपुढे सादरीकरण करण्यात आले. 13 कोटी भगवे उभारण्यासाठी नव्याने 397 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, येत्या 14 मे रोजी वढु बुद्रुकमध्ये प्रकल्पाचे भूमिपूजनही निश्चित करण्यात आले असल्याचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
"तुळापूर आणि वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397.54 कोटी, जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी 127.27 कोटी तसेच, सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासाचा मार्ग यामुळे खुला होणार आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! आपले सरकार, जनतेचे सरकार!"
 
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप महाराष्ट्र