"बेरोजगारीतून मुक्त होऊन आत्मनिर्भर करण्याची लढाई"
नमो महारोजगार मेळाव्यात मंत्री मंगलप्रभात लोढांचे प्रतिपादन
09-Dec-2023
Total Views |
नागपूर : युवक-युवतींना बेरोजगारीतून मुक्त करुन त्यांना आत्मनिर्भर करण्याची सर्वात मोठी लढाई महाराष्ट्रासमोर असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
दिनांक ९ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "महाराष्ट्रासमोर युवक-युवतींना बेरोजगारीतून आत्मनिर्भर करण्याची सर्वात मोठी ही लढाई आहे. या लढाईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृष्ण आणि अर्जुन या दोघांचीही भुमिका निभावत आहेत."
"महाभारतातील भीष्म हे सर्वात सहनशील व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जायचे. तशाच प्रकारे महाराष्ट्रातील राजकारणात उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस उत्तम सहनशीलतेचे उदाहरण आहे. ते एक उत्तम शांततेचे उदाहरण आहे," असेही लोढा म्हणाले. तसेच दोन दिवसांच्या या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास इत्यादींचे मार्गदर्शनदेखील करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तरुणांनी यात सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.