"हा काँग्रेसचा नसून अशोक गेहलोत यांचा पराभव आहे". कॉंग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

    07-Dec-2023
Total Views |

ashok gehlot
 
जयपुर: अशोक गहलोत यांचे माजी ओएसडी लोकेश शर्मा यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या सविस्तर पोस्टमधून गहलोत यांच्या कामगिरीवर तोफ डागली आहे. लोकशाहीत जनताच माय बाप असते आम्ही जनादेशाचा आदर करतो आणि त्याचा नम्रतेने स्वीकार करतो असही त्यांनी म्हटलं आहे. 
 
"मी परिणामांमुळे दुखावलो आहे, परंतु आश्चर्यचकित नाही. काँग्रेस पक्ष निःसंशयपणे राजस्थानमधील परंपरा बदलू शकला असता पण अशोक गेहलोत यांना कधीही बदल नको होता. हा काँग्रेसचा नसून अशोक गेहलोत यांचा पराभव आहे. पक्षाने गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, त्यांना मोकळा हात दिला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः प्रत्येक जागेवर निवडणूक लढवत होते. त्यांचा अनुभव किंवा जादू कामी आली नाही आणि प्रत्येक वेळेप्रमाणे काँग्रेस त्यांच्या योजनांच्या बळावर जिंकू शकली नाही किंवा प्रचारानेही काम केले नाही". असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
"हायकमांडची फसवणूक करणे, योग्य माहीती शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचू न देणे, दुसरा पर्याय तयार होऊ न देणे, अपरिपक्व आणि स्वार्थी लोकांच्या भोवऱ्यात राहून सतत चुकीचे निर्णय घेणे, सर्व प्रतिक्रिया आणि सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करणे. यामुळे आजचे हे निकाल निश्चित होते. हे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना यापूर्वी सांगितले होते, त्यांना अनेकवेळा इशाराही दिला होता, पण त्यांना कोणताही सल्ला किंवा सत्य सांगणारी व्यक्ती नको होती". असही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
"मी सतत सहा महिने प्रवास केला, राजस्थानातील शहरे-खेडे यांना भेटी दिल्या, लोकांना भेटलो, हजारो तरुणांशी संवादाचे कार्यक्रम आयोजित केले, सुमारे १२७ विधानसभा मतदारसंघ कव्हर केले आणि ग्राउंड रिपोर्ट्स मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले, जेणेकरुन वेळेत सुधारात्मक पावले उचलून निर्णय घेता येतील, ज्यामुळे पक्षाचे पुनरागमन सुनिश्चित होईल". असही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
आपल्याला ही निवडणुक लढवाण्याची इच्छा होती. आधी बिकानेर मधुन व नंतर भीलवाडा मधुन पण मुख्यमंत्र्यांनी नवीन प्रयाग करण्याचे धाडस दाखवले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. हायकमांडच्या विरोधात बंडखोरी होत असताना २५ सप्टेंबरची घटनाही पूर्णपणे प्रायोजित होती आणि त्याच दिवसापासून खेळ सुरू झाला होता. असही ते म्हणाले.
२५ सप्टेंबरची घटना काय होती ?
२५ सप्टेंबर २०२२ या दिवशी राजस्थान कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये सचिन पायलट यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले जाण्याची श्यक्यता होती. परंतु त्या बैठकीत अशोक गेहलोत समर्थक आमदारांनी गोंधळ केला होता.