"आज माझे मार्गदर्शक रतन टाटा सरांचा वाढदिवस आहे. आज माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते त्यांच्याच मुळे आहे. मी फक्त १८ वर्षांचा होतो तेव्हा रतन टाटा सरांनी माझ्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कच्च्या घड्याला आपल्या हाताने सावरले. त्यांनी आपल्या अनुभवातून मला दिशा दाखवली. त्यांचा आशीर्वाद मला संबल देतो. रतन टाटा यांते स्वप्न होते की, सर्व भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळावीत. जेनेरिक आधाराद्वारे आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वचन देतो की, जेनेरिक आधाराला आणखी मोठ्या आयामांपर्यंत घेऊन जाऊ जेणेकरून आपल्याला स्वस्तातून स्वस्त दरात औषधे मिळू शकतील."
अर्जुन देशपांडे आणि रतन टाटांचं अतूट नातं!
१. अर्जुन देशपांडे ह्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी "जेनेरिक आधार" (Generic Aadhar) या कंपनीची सुरवात केली.
२. गरिबांना स्वस्त दारात उत्कृष्ट दर्जाची औषधे उपलब्ध व्हावी या हेतूने प्रेरित होऊन अर्जुन देशपांडेंनी स्वतःला झोकून दिले.
३. एक वर्षाच्या आत अर्जुन देशपांडे यांच्या 'स्वस्त दारात उत्कृष्ट दर्जाची औषध उपलब्ध व्हावी' या महत्वाकांशी योजनेला पाठिंबा देण्यासाठी रतन टाटांनी अर्जुन देशपांडे सरांशी हातमिळवणी केली आणि त्यांच्या उपक्रमात गुंतवणूक केली.
४. अर्जुन देशपांडे हे एकमेव तरुण उद्योजक आहेत ज्यांना भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी दोनदा आमंत्रित केले होते. दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
५. अनेक राज्य सरकारे जेनेरिक आधारशी हातमिळवणी करत आहेत.
६. अर्जुन देशपांडेंनी जपानमधून भारतात विदेशी गुंतवणूक आणली.
७. ८० टक्के सवलतीत औषधे देऊन स्वस्त आरोग्य सेवा प्रदान करत आहेत.
८. मेट्रो शहरांमध्ये तसेच दुर्गम गावांमध्ये भारतभर २५०० पेक्षा जास्त फ्रेंचायझी जेनेरिक आधारच्या झाल्या आहेत.
९. २५०० पेक्षा जास्त सूक्ष्म उद्योजक निर्माण केले आणि १०००० च्या वर रोजगार निर्माण केलेत.
१०. अर्जुन देशपांडे खऱ्या अर्थाने भारतातील गोर-गरीब, सामान्य नागरिक आणि नव उद्योजकांना "जेनेरिक आधार" देऊन निरोगी आयुष्य देत भारताला स्वावलंबी बनवत आहेत.