पालिका कंत्राट मिळवण्यासाठी राऊतांच्या नावाचा वापर! घोटाळ्यात १२ कोटींची मालमत्ता जप्त

    22-Dec-2023
Total Views |
sanjay raut sujit patkar
 
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह शहरातील १२.२ कोटी रुपयांच्या तीन फ्लॅटची मालमत्ता जप्त केली आहे. सुजित पाटकर कोविड फील्ड हॉस्पीटल घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.
  
जप्त करण्यात आलेल्या फ्लॅटपैकी एक २.८ कोटी रुपये कींमतीचा फ्लॅट पाटकर यांच्या नावावर आहे. तर एक फ्लॅट सहआरोपी राजीव साळुंखे यांच्या मालकीचा आहे. सोनू बजाज या महिलेच्या नावावरही तिसरा फ्लॅट आहे. संलग्न मालमत्तेमध्ये डॉ. हेमंत गुप्ता यांची २.७ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि त्यांच्या बँक खात्यातील ३३.९ लाख रुपये त्याचबरोबर संजय शहा यांच्या बँक खात्यातील ३ कोटी रुपये यांचा समावेश आहे. या प्रकरणात गुप्ता आणि शहा हेदेखील सहआरोपी आहेत. 
 
या कारवाई नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 'एक्स' वर पोस्ट करत सुजित पाटकर यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांना कोविड काळात कोट्यावधी रुपयांची लुट झाली आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल अस म्हटल आहे.
 
 
 
दरम्यान, ईडीच्या आरोपपत्रानुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने खोटी कागतपत्र सादर करुन कोविड फील्ड हॉस्पीटल च कंत्राट मिळवल्याचा आरोप आहे. सुजित पाटकर , डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि आणखी एक सहआरोपी राजीव साळुंखे यांनी २०२० मध्ये लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीची स्थापना केली होती. कंत्राट मिळवण्यासाठी संजय राऊत यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचा आरोपही ईडीने केला होता. एलएचएमएसला बीएमसीकडून मिळालेल्या ३२ कोटी रुपयांच्या पेमेंटपैकी केवळ ८ कोटी रुपये प्रत्यक्ष कामावर खर्च करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.