"राऊत कुणाच्या चिन्हावर लढणार हे त्यांनी त्यांच्या मालकाला विचारावं!"

नितेश राणेंचा टोला

    13-Dec-2023
Total Views | 59

Rane & Raut


नागपूर : संजय राऊत कुणाच्या चिन्हावर लढणार हे त्यांनी त्यांच्या मालकाला विचारावं, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. गुरुवारी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत आम्हाला राजकीय दलाल वाटतात. त्यांनी दुसऱ्यांना नावं ठेवणं फार हास्यास्पद आहे. त्यांचा स्वत:चा भाऊ मशाल चिन्हावर लढणार की, शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार हे आधी जाहीर करावं. तुम्ही आतापर्यंत ज्यांची दलाली केली त्यांच्या पक्षात लढणार की, दुसरीकडे लढणार याबाबत स्पष्टता द्या," असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
 
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव न घेता ते म्हणाले की, "संजय राऊतांच्या मालकालादेखील कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते पायघड्या घालत आहेत," असा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे.
 
संघर्ष यात्रेवरील लाठीचार्ज नियोजित
 
रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर झालेला लाठीचार्ज हा नियोजित पद्धतीने करून घेतला होता. उगाच पोलिस खात्याला दोष नको. त्यांच्या संघर्ष यात्रेला कुत्र विचारत नाही ही आमची चुक नाही, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121