भाजपच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनेक दिग्गजांची उपस्थिती!

    13-Dec-2023
Total Views |

Narendra Modi 
 
 
नवी दिल्ली : मोहन यादव लवकरच मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
 
 
 
विष्णुदेव साई छत्तीसगडमध्ये दुपारी 2 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मध्यप्रदेशात मोहन यादव यांच्यासह राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर छत्तीसगडमध्ये विजय शर्मा आणि अरुण साओ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
 
 
 
मोहन यादव यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी खतलापूर मंदिरात प्रार्थना केली. जयपूरमध्ये भजनलाल यांनी मंदिरात प्रार्थना केली आहे.