१२ वी उत्तीर्ण ते पदवीधरांना मिरा भाईंदर महानगरपालिकेत काम करण्याची संधी

    13-Dec-2023
Total Views |
Mira Bhayander Municipal Corporation Recruitment 2023

मुंबई :
मिरा भाईंदर महानगरपालिकामधील रिक्त पदासाठी नवी भरती केली जाणार आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या अधिसूचनेनुसार पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
 
मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणाऱ्या पदभरतीकरिता अर्जस्वीकृतीस दि. १४ डिसेंबर २०२३ पासून सुरु होईल. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. २३ डिसेंबर २०२३ असणार आहे.
 
पदाचे नाव -

क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (०२)
 
शैक्षणिक पात्रता -
 
विज्ञान पदवीधारक, आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम.
 
वेतन -

निवड झालेल्या उमेदवारांना मासिक १५,५०० रुपये वेतन दिले जाईल.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटसला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.