'कलम ३७०'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "पाकव्याप्त काश्मीर जर..."
11-Dec-2023
Total Views |
नागपूर : जम्मु-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यावर आता उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर निवडणुकीपुर्वीच पाकव्याप्त काश्मीरदेखील आपल्याकडे आला तर संपुर्ण काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जम्मु-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणुका होतील, अशी आशा आहे. त्यामुळे तेथील जनतेला खुल्या वातावरणात मतदान करण्याची संधी मिळेल. यासोबतच निवडणुकीपुर्वीच जर पाकव्याप्त काश्मीरदेखील आपल्याकडे आला तर संपुर्ण काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील. तसेच २०१९ मध्ये केंद्र सरकारने 'कलम ३७०' हटवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता," असे त्यांनी म्हटले आहे.
मतसेच याविरोधात दाखल झालेल्या याचिका त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्यास सांगितले आहे.