मुंबई : "काँग्रेस मुक्त भारत जेव्हा होईल तेव्हा होईल पण उबाठा मुक्त संजय राऊत व्हायला हवं, संजय राऊत मुक्त उबाठा होण्याची वेळ आली. राऊत मुक्त उबाठा हे ज्या दिवशी होईल त्यावेळी असंख्य शिवसैनिक मोकळा श्वास घेतील" अस मत आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केलय. "काँग्रेसमुक्त भारतची घोषणा ही काही भाजपने दिली नव्हती. पण २०१४ पर्यंत काँग्रेस नेतृत्वाने जो भ्रष्टाचार माजवला होता त्यामुळे ही घोषणा लोकांच्या मनातुन आली होती. लोकांनी मनात आणलं तर काँग्रेसमुक्त भारत लवकरच होईल असही ते यावेळी म्हणाले.
"उबाठाची जी अवस्था झालीये ती संजय राजाराम राऊत यांच्या कुटुंबियांमुळे झाली आहे . त्यामुळे राजाराम राऊत यांच्या मुलांपासून मुक्त उबाठा जेंव्हा होईल तेंव्हाच असंख्य शिवसैनिक मोकळा श्वास घेतील". अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे
यापुढे बोलताना ते म्हणाले "संजय राऊत यांना अजित दादां बद्दल प्रेम एवढं का येत हा शोध लावण्याचा विषय आहे
मविआमध्ये अजित दादा होते त्यावेळी त्यांच्यावर टीका करत होते, आज संजय राऊतला ते मुख्यमंत्री होतील असे वाटते आहे." नितेश राणेंनी संजय राऊत यांना हिंमत आहे तर ईशान्य मुंबईत निवडणूक लढून दाखवण्याचे आव्हान देखील केले.
संजय राऊत नेहमीच सरकार पडणार असल्याची भाकीत करत असतात. आधी फेब्रुवारी मध्ये सरकार पडणार होत नंतर मे मध्ये व आता ३१ डिसेंबरला या काळात ते स्वतः १०० दिवस जेल मध्ये जाऊन आले पण आजपर्यंत त्यांची भाकीत कधीच खरी ठरलेली नाहीत असेही ते म्हणाले.