मुलुंड- भांडुपमध्ये घरांचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल!

    04-Nov-2023
Total Views |
Kirit Somaiya news

मुंबई:
मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे ७४३९ प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधली जात आहेत. मात्र या प्रकल्पग्रस्तांसाठींच्या घरांच्या बांधणीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वात भाजपचे कार्यकर्ते, नागरिक त्याबाबत जनजागृती मोहीम सुरू करीत आहेत.त्यांची माहिती सोमय्यांनी समाजमाध्यमांवर दिली.

मुलुंड येथील वर्ग २ ची जमीन नोव्हेंबर २०२० मध्ये वर्ग १ ची करण्यात आली. दोन्ही जमिनीचे आरक्षण या प्रस्तावानंतर बदलण्यात आले. यासाठी ५.४ एफएसआय मोफत देण्यात आला असून, पालिकेचे सगळे कर, शुल्क माफ करण्यात आले आहेत, असा दावा सोमय्यांनी केला आहे.तसेच उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये चार ठिकाणी मुलुंड, भांडुप, प्रभादेवी, चांदिवली याचे प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी कॉन्ट्रॅक्ट दिले.त्यात ५००० कोटींचा घोटाळा केल्याचे ही सोमय्या म्हणाले. तरी या प्रकरणाची चौकशी सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य कारवाई करतील, असे ही ते म्हणाले.