मिझोरामची कमान अपक्षांच्या हातात? एक्झीट पोलमध्ये त्रिशंकू परिस्थिती

    30-Nov-2023
Total Views |

mizoram
 
नवी दिल्ली :  मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीआधीची रंगीत तालिम आहे.
 
या पाच राज्यांमधील सर्वात लहान राज्य आहे, मिझोराम. या राज्यामध्ये सध्या मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. २०१८ च्या निवडणूकीत या पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, काँग्रेस. ४० जागांच्या या विधानसभेत भाजपला एका जागेवर विजय मिळवता आला होता. ख्रिश्चनबहुल असलेल्या या राज्यामध्ये मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि म्यानमारमधून आलेले शरणार्थी निवडणूकीचे मुद्दे होते.
 
या राज्यामध्ये सध्या आलेल्या काही एक्झीट पोलच्या आकडेवारीनुसार विधानसभा त्रिशंकु होण्याची शक्यता आहे. यावेळी मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसला प्रत्येकी १० ते १५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना सुद्धा १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यात दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा बोलबाला असेल, असं म्हणायला हरकत नाही. तर गेल्यावेळी एक जागा मिळवणाऱ्या भाजपला यावेळी एक्झीट पोलमध्ये शून्य ते दोन दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.