ठाणे : आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणार्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. महिलांना या उपक्रमातून रोजगार मिळणार असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दीड हजार किलो फराळ विक्री करण्यात आला होता, तर सुमारे १२ लाखांची उलाढाल १० ते १२ दिवसांत झाली होती. यातून प्रत्येक महिलेस १५ ते २० हजारांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती ‘महिला विकास परिवारा’चे पंढरीनाथ पवार यांनी दिली. घरपोच फराळासाठी ८०८२३७७७११ आणि ९१५२५१११७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिला विकास परिवार’ ही संस्था महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते.