महाराष्ट्र शासनात नोकरीची संधी! 'या' विभागात पदभरती सुरू, आजच अर्ज करा

    03-Nov-2023
Total Views |
Water Resources Department Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे जलसंपदा विभागातील विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनात नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी मिळणार आहे. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत होणाऱ्या या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, या भरतीद्वारे जलंसपदा विभागातील तब्बल ४४९७ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत, वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

जलसंपदा विभागातील भरतीकरिता अर्जदारास मुदत निश्चित करण्यात आली असून दि. ०३ नोव्हेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृती करण्यास सुरूवात आली असून अंतिम मुदत दि. २४ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. शैक्षणिक पात्रता पदांनुसार निश्चित करण्यात आली असून अर्जदारास अर्जशुल्क आकारले जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा