डाव्यांनी केरळ डबघाईला आणलं? सार्वजनिक मालमत्ता विकून कर्ज फेडण्याची वेळ

    03-Nov-2023
Total Views |
 karal
 
कोची : केरळ राज्य आर्थिक संकटाचा सामना करत आहे, अशी कबुली खुद्द केरळमधील डाव्या पक्षाच्या सरकारने दिली आहे. केरळमधील डाव्या पक्षाच्या सरकारने न्यायालयात सांगितले की, "केरळ राज्य सध्या आर्थिक अडचणींच्या सामना करत आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक संसाधनांमध्ये कोणताही आर्थिक लाभ देता येणार नाही."
 
केरळ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (केटीडीएफसी) लिमिटेडच्या ठेवीदाराची परतफेड करण्याशी संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केरळच्या पिनराई विजयन सरकारने माहिती दिली. केरळमध्ये आर्थिक आणीबाणीची स्थिती आहे का, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाने स्वीकारण्यास नकार दिला.
 
सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, "केटीडीएफसी आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) मालमत्ता गहाण ठेवू शकतात किंवा त्यांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मालमत्ता विकू शकतात."
 
काही दिवसांपूर्वीच डाव्यांच्या सरकारने केरळमध्ये मुस्लिम धर्माचा इतिहास शोधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यासोबतच मतपेढीच्या राजकारणासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी पीनरई विजयन यांच्या सरकारवर केरळची अर्थव्यवस्था डबघाईला आणल्याचा आरोप केला आहे.