‘द वायर’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

दिल्लीच्या मुख्य सचिवांविषयीचा बदनामीकारक लेख काढून टाकण्याचा आदेश

    22-Nov-2023
Total Views |
Delhi HIgh Court on The Wire Portal

नवी दिल्ली :
द्वारका एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केलेल्या भूसंपादनासंदर्भात दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्यावरील लेख काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाइन वृत्तसंकेतस्थळ ‘द वायर’ला दिले आहेत.

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी द वायर आणि वृत्तसंकेतस्थळाची वार्ताहर मीतू जैन यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी हा आदेश दिला आहे. नरेश कुमार यांनी द वायरला लेख काढून टाकण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्या विरोधात कोणतीही बदनामीकारक सामग्री प्रकाशित न करण्याचे निर्देश मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे लेखाच्या लिंक्स किंवा संदर्भ काढून टाकण्यासाठी ट्विटर आणि गुगललाही निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती.

द वायरने 9 नोव्हेंबर 2023 रोजी 'जमीन ओव्हर-व्हॅल्युएशन केसमध्ये लाभार्थी कुटुंबाशी दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या मुलाचे दुवे' या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला होता. लेखात असे म्हटले आहे की नरेश कुमार यांचा मुलगा करण चौहान यांचे एका कुटुंबाशी संबंध होते, ज्यांना दिल्लीच्या बामनोली गावात 19 एकर जमिनीचा भूखंड एनएचएआय ने द्वारका एक्सप्रेसवेसाठी संपादित केला तेव्हा वाढीव मोबदल्याचा फायदा झाला होता. त्यानंतर कुमार यांनी हायकोर्टात वकिलांच्या मार्फत वकिलांच्या माध्यमातून बानी दीक्षित, उद्धव खन्ना आणि कृष्ण कुमार यांनी द वायर आणि वार्ताहर मीतू जैन यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता.