मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी करण्यात येत आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेट बँक अंतर्गत 'ज्यूनियर असिस्टंट' या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून ८,२८३ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ज्यूनियर असिस्टंट पदाच्या एकूण ८,२८३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. सदर भरती संपूर्ण देशभर करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यानुसार रिक्त पदे निश्चित करण्यात आली आहेत. या भरतीकरिता उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून राखीव प्रवर्गासाठी ३३ वर्षे तर ओबीसी प्रवर्गासाठी ३१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
तसेच, अर्जदारास फॉर्म भरताना अर्जशुल्क आकारले जाणार असून सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गांसाठी ७५० रुपये अर्जशुल्क आकारले जाणार आहे. तसेच, राखीव प्रवर्गासाठी अर्जशुल्कात सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर, अर्ज करण्यास दि. १७ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात झाली असून अंतिम मुदत दि. ०७ डिसेंबर २०२३ असणार आहे.