राम शिंदेंनी दिला रोहित पवारांना दणका!

    13-Nov-2023
Total Views | 70
 
Rohit Pawar
 
 
मुंबई : भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. सरपंच सुभाष आव्हाड यांनी सदस्यांसह राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. तसेच युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
 
कर्जत-जामखेडमध्ये मिळून एकूण ९ ग्राम पंचायती आहेत. यात भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे ५ ग्रामपंचायती तर आमदार रोहित पवार यांच्याकडे २ ग्रामपंचायती आहेत. १ ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे. तर १ स्थानिक आघाडीकडे आहे. जवळा ग्रामपंचायत स्थानिक आघाडीने जिंकली होती. जवळा ही जामखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. सरपंच सुभाष आव्हाड यांनी सदस्यांसह केलेल्या पक्षप्रवेशामुळे रोहित पवारांच्या आगामी निवडणुकांसाठी अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121