स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ला विक्रमी मागणी

    01-Nov-2023
Total Views |

savarkar

पुणे :
सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीस वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ‘भारतीय विचार साधना’ प्रकाशनाच्यावतीने १०४ पानांचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती लेखक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी दिली आहे. ज्या वाचकांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास त्यांनी आजच नोंदणी करून प्रकाशनपूर्व ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आयसीएचआर’ शिष्यवृत्तीअंतर्गत लंडनच्या ब्रिटिश लायब्ररी आणि दिल्लीतील ‘नॅशनल अर्काव्हमधील संशोधन’ या पुस्तकात समाविष्ट आहे.याशिवाय मूळ समग्र सावरकर वाङ्मय, समकालीन आठवणी, समकालीन वृत्तपत्र, अहवाल, शोधनिबंध, अप्रकाशित पीएचडी थेसिस याचा अभ्यास करून संदर्भ जे सामान्य वाचकाला समजतील अशा साध्या, सोप्या भाषेत या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.

या पुस्तकाची मूळ किंमत रुपये २०० असून प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास विशेष ५० टक्के सवलतीत १०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार असून कुरियर चार्जेस ५० (महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राबाहेर १००) आहेत, ज्या वाचकांना हे पुस्तक घरपोच हवे असल्यास एकूण १५० रुपयांत एका प्रतीसाठी ९३५६९६९२२४ या क्रमांकावर गुगल पे करून घरपोच मागविता येईल.वाचकांनी या पुस्तकाच्या दहा प्रती घेतल्यास एक हजार रुपयांत घरपोच मिळतील. या पुस्तकाचे वितरण बुधवार, दि. ८ नोव्हेंबरनंतर सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.