मुंबई : साहित्य संस्कृती वाढीस लागावी त्याचबरोबर वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यात मेहता पब्लिशिंग हाऊस नेहमीच प्रयत्नशील असते. उत्सव पुस्तकांचा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. प्रदर्शनाचे उदघाटन दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होईल. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि लेखक संजय सिंह उपस्थित असतील. तर समारोप रविवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. यावेळी पत्रकार लेखक जितेंद्र दीक्षित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
आपक्ल्या फेसबुक पेजवरून त्यांनी पुस्तक प्रेमींना भेट देण्याचे आवाहन केले आहे. हे संमेलन संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात तब्बल दहा दिवस सुरु असणार आहे. अनेक पुस्तकांवर मोठी सूट यावेळी वाचकांना मिळणार आहे. सकाळी ९.३० पासून ते संध्याकाळी ८.३० पर्यंत हे प्रदर्शन खुले असणारा आहे.